AurangabadNewsUpdate : रुग्णालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न ९ जणांना अटक व सुटका

औरंगाबाद – जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काबरा रुग्णालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्या ९ जणांना जिन्सी पोलिसांनी अटक करुन जामिनावर सोडले. दोन वर्षांपूर्वी २०१९ मधे मुंबई उच्चन्यायालयाने मराठा आरक्षण दिल्यानंतर राज्यातील सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संघटनेने त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका सुरु ठेवण्यामधे राज्यातील काही नागरिकांनी आर्थिक मदत केली होती.त्या लोकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले.
अटक आरोपींमधे ज्ञानेश्वर गायकवाड प्रदेशाध्यक्ष छावा श्रमिक संघटना,सुनिल कोटकर अध्यक्ष झुंजारछावा संघटना, रविंद्र काळे प्रवक्ता छावा मराठा संघ, भरत कदम जिल्हाध्यक्ष व पंढरीनाथ गोडसे कार्याध्यक्ष मराठामावळा संघटना,संजय सावंत अध्यक्ष शिव क्रांतीसेना,गणेश उगले अध्यक्ष स्वाभिमानी संघटना व निलेश डव्हळे यांचा समावेश आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिन्सी पोलिस करंत आहेत.