Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जंगलच्या राजालाही कोरोनाने घेरले !!

Spread the love

हैद्राबाद : हैद्राबादमधल्या नेहरु प्राणीसंग्रहालयातल्या ८ सिंहांना करोनाची लागण झाली असून द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार, या प्राणीसंग्रहालयातल्या अधिकाऱ्यांनीही  या वृत्ताला पुष्टी दिली आहे. या सिंहांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आहे.या सिंहांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

या परिसरात खबरदारीच्या सर्व नियमांचं आता पालन करण्यात येत असून प्राणी संग्रहालय आता बाहेरील लोकांसाठी बंद करण्यात आलं आहे. द हिंदूने याविषयी दिलेल्या वृत्तानुसार, या सिंहांना कोरडा खोकला, नाक वाहणं, खाण्यापिण्याच्या तक्रारी अशी लक्षणं दिसून आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. २४ एप्रिलला सिंहांना ही लक्षणं जाणवत असल्याचं प्राणी संग्रहालयाच्या केअरटेकर्सच्या लक्षात आलं होतं.

दरम्यान याआधीही  अन्य देशात प्राण्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत होतं. मात्र, भारतात प्राण्यांना करोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. या प्राणी संग्रहालयातल्या १२हून अधिक कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!