Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : वैद्यकीय सुविधांसाठी उद्योजकांना विनंती करुन निधी उपलब्ध करावा , जनहित याचिकेवर खंडपीठाचे निर्देश

Spread the love

औरंगाबाद – जिल्ह्यामधे नवीन व्हेंटिलटर उपलब्ध करुन देण्यासाठी व रेमडिसिव्हीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी विभागिय आयुक्तांनी उद्योजकांना विनंती करुन निधी उपलब्ध करावा असे निर्देश आज न्या.रविंद्र घुगे आणि न्या. देबडवार यांनी दिले.

२६ एप्रिल रोजी अॅड. सत्यजित बोरा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज दुसरी सुनावणी होती.याचिकेमधील विविध विषया संदर्भात खंडपीठाने निर्देश जारी केले आहेत. स्वीडीश कंपनीने जे व्हेंटिलैटर देशात पुरवले होते. त्यातून जिल्हा प्रशासनाला जे मिळाले त्याबाबत सविस्तर अहवाल खंडपीठाला सादर करा.,तसेच आ.संजय शिरसाठ यांनी वाळूज औद्योगिक परिसरात एका उदघाटनाच्या कार्यक्रमात कोरोना संक्रमणाचे नियम न पाळल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे का ? त्याचबरोबर  महापालिकेने विद्युत दाहिनी खूप खर्चिक असल्यामुळे बंद करुन एलपीजी गॅसवर चालणारे स्मशानभूमी (क्रिमीटोरिअम) सुरु करण्यापूर्वी काही निविदा काढल्या होत्या काय या कामाची सुरुवात कशी केली याची माहिती मनपा आयुक्तांनी द्यावी.असे विविध निर्देश जारी केले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!