Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : अदर पुनावाला यांना कोण कशासाठी धमक्या देत आहेत ?

Spread the love

नवी दिल्ली : आज दिवसभरात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांची मुलाखत चांगलीच गाजत आहे . त्यांच्या म्हणण्यानुसार ”देशातील अनेक बड्या व्यक्तींच्या दबाव टाकणाऱ्या फोन कॉल्समुळे आपल्या त्रास होत आहे.” असे  पुनावाला यांनी म्हटले आहे. कोविशिल्ड लशीसाठी आपल्याला देशातील काही बड्या व्यक्तींचे फोन येत आहेत. यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचाही समावेश आहे, असे  पूनावाला यांनी म्हटले  आहे. टाईम्स यूकेला दिलेल्य मुलाखतीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे.

अदर पुनावाला यांनी द टाईम्स यूकेला दिलेल्या मुलाखतीत  म्हटले आहे  की,  मागील काही दिवसांमध्ये काही शक्तीशाली लोक,  ज्यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचा समावेश आहे, त्यांच्याकडून वारंवार फोन येत आहेत. आम्हालाच लस लवकर हवी आहे, असे  म्हणत त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे. याला धमक्या म्हणणे  फार साधी गोष्ट ठरेल. या लोकांना असणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्याकडून वापरली जाणारी भाषा खरोखर खूपच विचित्र आहे. खरे  तर हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. प्रत्येकाला आपल्याला लस मिळावी असे  वाटते  आहे. मात्र आपल्याआधी इतरांना लस का दिली जात हे त्यांना समजत नसल्याने  अडचणी  निर्माण होत आहेत.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अदर पूनावाला हे सध्या कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये आहेत. तिथेच त्यांनी ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत या दबावाबद्दल माहिती दिली तसेच सीरम इन्स्टिट्यूट आता देशाबाहेर लस निर्मितीचा प्लॅन्ट सुरू करण्याचेही नियोजन करत असल्याचेही ते म्हणाले. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींना भारत सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, आत्तापर्यंत देशात झालेल्या लसीकरणामध्ये सर्वाधिक लसीकरण हे अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीचे  झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!