Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCoronaUpdate : गेल्या  24 तासात देशभरात 3 लाख 15 हजार 478 नवीन रुग्ण, 2101 जणांचा मृत्यू

Spread the love

नवी दिल्ली  : गेल्या  24 तासात देशभरात 3 लाख 15 हजार 478 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत एकाच दिवसात आढळलेली ही केवळ भारतातील नाही तर जगभरातील सर्वाधिक संख्या आहे. याआधी जगात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या नावावर होता. अमेरिकेत 8 जानेवारी 2021 रोजी 3,07,570 कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, आता याबाबतीत भारत सर्वात पुढे आहे.

दरम्यान मागील 24 तासात 2101 जणांचा मृत्यू झाला आहे तर  1 लाख 79 हजार 372 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 84 हजार 672 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 कोटी 59 लाख 24 हजार 732 इतकी झाली आहे. देशात सध्या  सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाख 84 हजार 209 आहे. हे रुग्ण एकूण बाधितांच्या संख्येपैकी 14.3 टक्के आहेत.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह 11 राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत आहे. या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 67,468 नवीन रुग्ण आढळले आहेत. 54,985 रुग्ण बरे झाले आहेत आणि 568 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 40.27 लाख लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. यातील 32.68 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर, 61,911 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6.95 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जगभरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढतच आहे. मागील सात दिवसांच्या आत जगात 55 लाख 23 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. संक्रमितांच्या संख्येत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. या आठवड्यात 80 हजार 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या प्रमाणात 7% वाढ झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!