NandedNewsUpdate : हृदयद्रावक : कोरोनामुळे पतीचे निधन होताच “तिने”ही चिमुकल्यासह घेतली विहिरीत ऊडी !!

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात मनाला सुन्न करणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. कोरोना संसर्गाने पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच, पत्नीनेही अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन चिमुकल्या मुली अनाथ झाल्या आहेत. या घटनेने लोहा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , मूळचे आंध्र प्रदेशातील शंकर गंदम हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायानिमित्त लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात पत्नी आणि दोन मुली, एका मुलासह राहत होते. शंकर हे अँटिजेन चाचणीसाठी लोहा ग्रामीण रुग्णालयात गेले होते. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला.