Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्याच्या गृहमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर याबाबत निर्णय झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Advertisements

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. तसेच, इथून पुढे गृहमंत्रालयाची जबाबदारी आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राहणार असल्याचेही कळवले आहे. तर, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा कार्यभार आता हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!