MaharashtraNewsUpdate : घर खरेदी विक्री करताय ? आता ५ टक्केच मुद्रांक शुल्क !!

मुंबई । घर खरेदी-विक्री करणाऱ्यांच्या खिश्याला आता कात्री बसणार आहे. घर जमीन खरेदी विक्री करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. उद्यापासून मुद्रांक शुल्कात 2 टक्के सवलत होती ती रदद् करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता घर, जमीन विक्रीसाठी 5 टक्के मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे.
मुद्रांक शुल्कात सवलत देण्याबाबत मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव महसूल विभागाने दिला होता. पण वित्त विभाग आणि मुख्यमंत्री यांनी त्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे आधी मुद्रांक सवलत मिळत होती, ती मिळणार नाही.
राज्यातील बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था येण्याच्या दृष्टिकोनातून गतवर्षी राज्यशासनाने दिनांक 31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती. सदर सवलत संपुष्टात आली असून यापुढे नियमित स्वरूपात मुद्रांक शुल्काचे दर लागू राहतील.
मुद्रांक शुल्कात सवलत देण्यासाठी आणि मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव महसूल विभागाने दिला होता पण वित्त विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे उद्या पासून या आधी मुद्रांक सवलत होती ती मिळणार नाही. त्यामुळे आता उद्यापासून मुद्रांक शुल्कात 2 टक्के सवलत होती ती रदद् केली आहे.