25 तारखेपर्यंत सचिन वाझेंना एनआयए कोठडी

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकांप्रकरणी अटक करण्यात आलेले मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे.
काल रात्री (13 मार्च) 11 वाजून 50 मिनिटांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान, त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती मात्र, एनआयए कोर्टाने केवळ दहा दिवस म्हणजेच, 25 तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.
कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते. चौकशीनंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आज रविरारी त्यांना सुट्टीकालीन कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या वकिलांनी वाझे यांना १४ दिवसांची एनआयए कोठडी द्यावी अशी मागणी केली. कोर्टाने मात्र त्यांना २५ मार्च पर्यंत कोठडी ठोठावली आहे.
MumbaiNewsUpdate : सचिन वाझे यांच्या अटकेवर शरद पवार , अनिल देशमुख , संजय राऊत यांच्या अशा आहेत प्रतिक्रिया