IndiaNewsUpdate : खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास

Advertisements
Advertisements
Spread the love

भोपाळच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होवू लागल्याने आज मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आल्यानंतर कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना एकाच  महिन्यात रुग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ आहे. १ फेब्रुवारीलाही  त्यांना अशाच मुद्द्यांसाठी नवी दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थान (एम्स) येथे नेण्यात आले. यापूर्वी, कोविड – १९ ची लक्षण दिसू लागल्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये त्यांना एम्समध्ये दाखल केले गेले होते.

Advertisements

मालेगावमध्ये झालेल्या २००८ च्या बॉम्बस्फोटातील एक प्रमुख आरोपी म्हणून  त्यांचे नाव घेतले जाते. या दुर्घटनेत १० लोक ठार आणि अनेकजण जखमी झाले होते. त्यांना २०१७ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोग्याच्या कारणावरून जामीन मंजूर केला होता. भोपाळमधील २०१९ लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा ३.६ लाख मतांनी पराभव केला. दहशतवादाचा आरोप असलेली व्यक्ति भारतात खासदार बनण्याची ही पहिलीच वेळ होती.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!