CoronaNewsUpdate : सावधान , गेल्या २४ तासात वाढले १० हजाराहून अधिक रुग्ण

गेल्या २४ तासात राज्यात १० हजार १८७ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर ४७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ टक्के एवढा आहे. आज ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत. राज्यात सध्या एकूण ९२ हजार ८९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण आता अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे.
आतापर्यंत राज्यात एकूण २०,६२,०३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.३६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६७,७६,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,०८,५८६ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,२८,६७६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर ४,५१४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण ५२ हजार ४४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra reports 10,187 new COVID-19 cases, 6,080 discharges, and 47 deaths in the last 24 hours
Total cases: 22,08,586
Total recoveries: 20,62,031
Death toll: 52,440
Active cases: 92,897 pic.twitter.com/6G5x60MSoy— ANI (@ANI) March 6, 2021
राज्यात मागील कित्येक दिवसांपासून रुग्णसंख्येची वाढ होताना दिसत आहे. दररोज ७ ते ९ हजाराच्या सरासरीन रुग्ण आढळून येत असतानाच शुक्रवार रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. राज्यात जवळपास पाच महिन्यानंतर २४ तासांच्या अवधीत १० हजारांपेक्षा करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून, केंद्र सरकारही सावध झालं आहे. केंद्र सरकारने पंजाब आणि महाराष्ट्रातील करोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये मोठ्या कालावधीनंतर पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून महाराष्ट्र आणि पंजाबमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून विशेष पथके पाठवण्यात येणार आहेत. ही पथके राज्य सरकारांसोबत करोना परिस्थितीवर नजर ठेवण्याबरोबरच संक्रमण नियंत्रण आणि साखळी तोडण्यासाठी राज्यांच्या आरोग्य विभागांना मदत करणार आहे.