महापालिकेच्या मूर्खपणामुळे अदालतरोड जाम,पोलिसांनी खाक्या दाखवताच झाले सुतासारखे सरळ

औरंगाबाद – महापालिकेच्या मूर्खपणामुळे आज सकाळी ९. ३०वा. अदालत रोड जाम झाला.हा प्रकार वाहतूक शाखेला कळल्यावर महापालिकेच्या अधिकार्यांना पोलिसीखाक्या दाखवून वाहतूक सुरळित करुन दिली.
सोमवारी सकाळी ९.३०च्या सुमारास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने चुन्नीलाल पेट्रोलपंपासमोरिल क्रांतीचौकाकडे जाणारा रस्ता उड्डाणपुलाजवळ खोदून बँरिकेडस लावले.त्यामुळे अमरप्रित चौकापर्यंत रस्ताजाम झाला.हा प्रकार वाहतूकशाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे आणि पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मनपा अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले.पोलिसांचा रुद्रावतार पाहून महापालिकेच्या अधिकार्यांची बोबडी वळली व माफी मागून ताबडतोब काम बंद करुन रस्ता मोकळा करुन दिला. शहरात कुठेही महापालिकेला रस्ता खोदण्याचे काम करण्यापूर्वी वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी लागते. वाहतूक विभागाने परवानगी दिल्यानंतर वेळेचे नियोजन करुन काम केले जातेया प्रकरणात महापालिकेने वाहतूक विभागाला प्रेमपत्र पाठवल्यासारखे पत्र धाडून काम सुरु केले.असा आरोप पोलिसांनी केला. त्यामुळे मनपाच्या बेजबाबदारपणाचा प्रत्यय अधिकार्यांनी चूक मान्य करंत खाली मान घातल्यामुळे आला.