तडीपार गुंडाचा खून,सी.सी.टि.व्ही.फुटेजमुळे एक अटक दोघे ताब्यात

औरंगाबाद – पैशे हिसकावतांना झालेल्या भांडणामुळै तडीपार गुंडाचा रेकाॅर्डवरील गुन्हेगाराने दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने औरंगपुर्यातील पिया मार्केट जवळील बियर शाॅपी जवळ गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मांडीची नस कापून खून केला. या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी एकाला अटक केली तर दोघांना ताब्यात घेतले.
चिराग बिडला(२२) रा. गांधीनगर असे अटक आरोपीचे नाव आहे.तर समीरखान सिकंदरखान (२७) रा. आसेफिया काॅलनी असे मयताचे नाव आहे.मयत हा जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करंत होता.
चिराग बीडला आणि त्याच्या साथीदारांनी दारुच्या नशेत हा खून करुन पळ काढला.जखमी अवस्थेत मयत समीर चा मित्र मोहम्मद आदिल ने घाटी रुग्णालयात नेले तेथील डाॅक्टरांनी समीरखान ला तपासून मयत घोषित केले. सिटीचौक पोलिसांनी आदिल ची मदत घेत घटनास्थळाजवळील सी.सी. टि.व्ही. फुटेज तपासले. आदिल यास दाखवले.आदिल ने आरोपींना औळखात चिराग बिडला ला अटक केली. चिराग बिडला ने काही दिवसांपूर्वीच शिवाजी हायस्कूल परिसरात श्र्वानाला फरफटत नेल्याचा गुन्हा दाखल आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मयताला त्याच्या कुटुंबियांकडे सोपवले. यावेळी पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा बंदोबस्त ठेवला होता. या प्रकरणात पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे, संभाजीपवार, दादासाहैब शिनगारे, सचिन सानप अथक परिश्रम घेतले. पुढील तपास सिटीचौक पोलिस करंत आहेत.