तीन दुचाकी चोरट्यांच्या गुन्हेशाखेने मुसक्या आवळल्या चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंगाबाद : शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांच्या गुन्हेशाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्यांकडून चोरीच्या पाच दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी गुरूवारी (दि.१४) कळविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल रतन पारखे (वय ३२, रा. रेवगांव जि. जालना, ह.मु. अंबिकानगर, मुकुंदवाडी), रणजित लहू जाधव (वय ३०) आणि गोकूळ लहू जाधव (वय २४, दोघे रा. चराठा, ता.जि.बीड ह.मु. भक्तीनगर, अंबडरोड जालना) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाहन चोरट्यांची नावे आहेत. मुकुंदवाडी परिसरातील सुनिल पारखे याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे, मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवन इंगळे, विठ्ठल चासकर, सहाय्यक फौजदार शेख नजीर, नजीर पठाण, सतीश जाधव, मिसाळ, म्हस्के, बीडकर, धुळे, खरात आदींच्या पथकाने सापळा रचून सुनिल पारखे याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपल्या साथीदार असलेल्या रणजित जाधव, गोकूळ जाधव यांच्या मदतीने शहराच्या विविध भागातून पाच दुचाकी चोरी केल्या असल्याची कबूली पोलिसांना दिली.
पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!