Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चुकीचे वीज बील देणाऱ्या महावितरणला न्यायालयाचा झटका महावितरणला ठोठवला २ हजारांचा दंड

Spread the love

औरंंगाबाद : चुकीचे वीज बील दिल्याप्रकरणी ग्राहकाने दाखल केलेल्या दाव्यात, स्थायी लोकअदालतीचे अध्यक्ष पी.एस. शिंदे, सदस्य बी.जी. राजे आणि के.के. काळे यांच्या मंचाने महावितरण कंपनीला जोरदार झटका दिला. ग्राहकाला चुकीचे बील दिल्याकारणाने मंचाने महावितरण कंपीनला दोन हजार रुपयांचा दंड (कॉस्ट) ठोठाविला.
प्रकरणात शिला किसन पवार (वय ५२, रा. जीआरबी सोसायटी सातारा परिसर, बीड बायपास) यांनी अ‍ॅड. हरमेश शामनानी यांच्यामार्फत अर्ज सादर केला होता. त्यानूसार, पवार यांना महावितरण कपंनीच्या छावणी शाखेने सप्टेंबर २०१९ मध्ये १६२२ यूनीटचे १८ हजार ६९० रुपयांचे चुकीचे वीजबील दिले होते. हे वीजबील रद्द करावे अशी विनंती अर्जात करण्यात आली होती. अर्जावरील सुनावणीअंती मंचाने, महावितरण कंपनीने अर्जदाराच्या मिटरची योग्य रिडींग न घेता चुकिचे व वाढीव वीज बील दिल्याचे निरीक्षण नोंदवित, सदरील बील रद्द केले. व महावितरण कंपनीला दोन हजारांची कॉस्ट (दंड) दंड ठोठाविला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!