विवाहितेची आत्महत्या सासरच्यांविरुध्द गुन्हा

सासरच्या छळाला कंटाळून औरंगाबाद हर्सूल परिसरात विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
आश्विनी धम्मपाल वानखेडे(२४) रा. चेतनानगर हर्सूल असे मयताचे नाव आहे.तर धम्मपाल वानखेडे, तारा वानखेडे, ननंदा नीता, शुभांगी आणि माधूरी व अन्य दोघांचा आरोपीं मधे समावेश आहे.
गेल्या १९एप्रिल पासुन मयत आश्विनीचा सासरची मंडळी छळ करंत होती. आश्विनीच्या वडलांच्या शेतीत वाटा आणि १लाख रु. अशी मागणी करंत छळ करंत होते. अशी तक्रार मयत आश्विनी चे वडील अशोक खंडाळे यांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ठोकळ करंत आहेत