बोलेरो चालकास शिवीगाळ करून माहराण

दुचाकीला हुलकावणी का दिली असे म्हणत एकाने बोलेरो जीप चालक विशाल हरिश्चंद्र पवार (वय २०, रा.येसगाव, ता.गंगापूर) याला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना औरंगाबाद ते अहमदनगर महामार्गावरील टोलनाक्याजवळ २ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विशाल पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईयू-६६४०) चा चालक उमेश रमेश शिंदे (वय २५, रा.मनिषानगर, वाळूज) याच्याविरूध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.