Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : सुशांत सिंहच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीवर बोलले गृहमंत्री अनिल देशमुख

Advertisements
Advertisements
Spread the love

देशभर गाजलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या मुद्यावरून राज्यात मोठा वाद झाला होता. त्याचबरोबर सुशांतची हत्या झाल्याचा आरोपही करण्यात आला. नंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आली होती. मात्र, सीबीआयकडून यावर कोणतही भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यावरून गृहमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Advertisements

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा  १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र उलटसुलट चर्चांचे पेव फुटले होते. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर हत्या असल्याचंही म्हटलं होतं. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचं गुढ उलगडलेलं नाही.

Advertisements
Advertisements

दरम्यान पत्रकारांशी बोलताना सीबीआयच्या तपासाबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केलं आहे. “सीबीआयने तपास सुरू करून आता जवळपास पाच महिने झाले आहेत. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!