AurangabadNewsUpdate : मनमाड ते नांदेड रेल्वे विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते

औरंंंगाबाद : मनमाड ते नांदेड असे विद्युतीकरणाच्या कामाला जानेवारीत शुभारंभ होणार असून यासाठी यापूर्वीच ३२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे उद्दघाटन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. भागवत कराड यांनी दिली. ते दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक उपेंदर सिंग यांच्या सोबत शनिवारी(दि.२६) झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
नांदेड विभागाचे व्यवस्थापक उपेंदर सिंग, अभियंता ब्रम्हानंद रेड्डी, अभियंता सुब्बाराव आदीचे पथक शनिवारी सकाळी औरंगाबादेत दाखल झाले. या पथकाने चिकलठाणा, औरंगाबाद रेल्वेस्थानक, दौलताबाद आदी ठिकाणी पीट लाईन टाकता येईल का याची पाहणी केली. यात औरंगाबाद व दौलताबाद येथे जागाच उपलब्ध नसल्याने पीट लाईन चिकलठाणा येथे टाकता येऊ शकते. अशी शक्यता व्यक्त करत लवकरच अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती उपेंदर सिंग यांनी दिली.
दरम्यान यानंर उपेंदर सिंग व त्यांच्या पथकांसोबत खासदार डॉ. भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी बैठक घेतली. या बैठकीनंतर डॉ. कराड यांनी मनमाड ते नांदेड अशा विद्युतीकरणाच्या निविदा नुकत्याच निघाल्या असून यासाठी लागणा-या ३२० कोटीच्या रकमेला यापूर्वीच मंजूरी मिळाली आहे. यामुळे या कामाचा शुभारंभ जानेवारीत होणार असून याचे उद्घाटन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचीही माहिती डॉ. कराड यांनी दिली.
मुकुंदवाडीत स्कायवॉकसह भुयारी मार्ग
या बैठकीत शरणापूर फाटा ते मुकुंदवाडी दरम्यान सहा ते सात ठिकाणी क्रॉसिंग आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी भांगसीमाता गडाजवळ, रेल्वे पूल तयार करण्यात येत आहे. तर गोलवाडीचे काम सुरू आहेत. त्यानंतर रेल्वे एमआयडीसी व शिवाजीनगर परिसरात लवकरच भुयारी मार्गाचे काम करण्यात येणार असून मुकुंदवादी रेल्वे स्थानकावर स्कॉय वॉक व भुयारी मार्ग करण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.