Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadLatestNewsUpdate : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ : सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक !! महाविकास आघाडीचा मोठा विजय ,57 हजार 895 मतांची आघाडी

Advertisements
Advertisements
Spread the love

“सच” का सामना बोराळकरांना भारी पडला : अवैध मतांची संख्या २३०००

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या  निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हि घोषणा केली.  चव्हाण यांनी सलग विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केलं. पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. तब्ब्ल २० तास हि मतमोजणी चालली.


झालेल्या एकूण 2 लाख 41 हजार 908 मतदानापैकी तब्बल 23 हजार 92 इतकी मते अवैध ठरली. त्यापैकी  सतीश चव्हाण यांना एकूण 1 लाख 16 हजार 638 मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58, हजार 743 मते मिळाली. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण 57 हजार 895 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या निवडणुकीत पहिल्यांदाच महाविकास आघाडीविरुद्ध भाजप सामना  झाला. प्रारंभीच्या काळात निवडणुकीत चुरस निर्माण होईल असेवातले होते परंतु मोठ्या फरकाने सतीश चव्हाण यांनी विजय मिळवत आपली हॅट्ट्रिक कायम केली..

Advertisements

२३ हजार मते झाली बाद

उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत. तितके पसंतीक्रमांक नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंती क्रमांकाचा अंक नोंदवावा लागतो. तो पसंती क्रमांक इतर कोणत्यही उमेदवारासमोर नोंदवू नये अस नियम आहे. पसंतीक्रमांक हे केवळ 1,2,3, अशा अंकामध्ये नोंदवाव. एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांत नोंदवू नये असा नियम आहे . तरीदेखील उच्चशिक्षित 23 हजार पदवीधर उमेदवारांना मतदान करता आले नाही हे विशेष.

Advertisements
Advertisements

प्रमुख उमेदवारांचे अंतिम फेरीतील मतदान

सतीश भानुदासराव चव्हाण ( महाविकास आघाडी ) : 116638

बोराळकर शिरीष ( भाजप ) : 58743

प्रा. नागोराव काशिनाथ पांचाळ ( वंचित बहुजन आघाडी ) : 8993

कुणाल गौतम खरात ( एमआयएम ) :  1454

रमेश पोकळे ( भाजप बंडखोर ) :  6712

सिद्धेश्वर मुंडे : 8053

सचिन राजाराम ढवळे : 11702

आपलं सरकार

Click to listen highlighted text!