LatestNewsUpdate : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ : मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत सतीश चव्हाण यांची 41 हजार 198 मतांची आघाडी

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 57074, दुसऱ्या फेरीत 56000 तर तिसऱ्या फेरीत 56000 इतक्या मतांची मोजणी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कळविले आहे.
सतीश भानुदासराव चव्हाण ( महाविकास आघाडी ) : 81216
बोराळकर शिरीष ( भाजप ) : 40018
प्रा. नागोराव काशिनाथ पांचाळ ( वंचित बहुजन आघाडी ) : 6403
कुणाल गौतम खरात ( एमआयएम ) : 978
रमेश पोकळे ( भाजप बंडखोर ) : 5828
सिद्धेश्वर मुंडे : 5976
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी ८.०० वाजेपासून मराठवाडा रिलेटर्स प्रा.लि. कलाग्रामच्या समोर एमआयडीसी चिकलठाणा येथे सुरू करण्यात आली आहे. या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 57074 तर दुसऱ्या फेरीत 56000 इतक्या मतांची मोजणी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कळविले आहे.