AurangabadNewsUpdate : पदवीधर निवडणूक मतमोजणीच्या धामधुमीत शहरात ईडी ची धाड

औरंगाबाद -एकीकडे शहरात पदवीधर निवडणूकीची मतमोजणी सुरू असताना दुसरीकडे शहरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या राज्य कार्यालयावर अंमलबजावणी संचनालय (ईडी) ने आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास धाड टाकली. अशी माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जवळपास अडीच ते तीन तास अधिकाऱ्यांनी कार्यालयाची झाडाझडती घेतली.
शहरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या राज्य कार्यालयावर ईडी च्या ४ ते ५ अधिकार्यांनी भेट दिली. काही कागदपत्रे तपासली. काही गोपनीय माहितीच्या आधारे ईडी ने ही धाड टाकल्याची माहिती केंद्रे यांनी दिली. यावेळी ईडी ने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या दोन नेत्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती उजेडात आली. तसेच ईडी च्या माणसांनी काही कागदपत्रे ही सोबत नेल्याचे सांगितले आहे. दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनापासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केंद्रातील मोदी सरकार ईडीच्या द्वारे ही खेळी करत आहे. याविरोधात आम्ही कायदेशीर लढा देऊ, असा आरौप पॉप्युलर फ्रंट ने केला आहे.
Kerala: Enforcement Directorate conducts raid at locations of OMA Salam, Chairman Popular Front of India and PFI National Secretary, Nasaruddin Elamaram, in Malappuram and Thiruvananthapuram
— ANI (@ANI) December 3, 2020
याबाबत एएनआयने दिलेल्या बातमुनीसार ईडीने केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओमा सलाम आणि राष्ट्रीय सचिव नसरुद्दीन इलाम राम यांच्या कार्यालयावरही किडीने छापा टाकला आहे. औरंगाबाद शहरात जुना बाजीपुरा येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे हे कार्यालय आहे. झडतीच्यावेळी जिल्हा कमिटीचे सदस्य कलीम यांची उपस्थिती होती. दरम्यान संस्थेचे जिल्हाध्यक्ष इरफान मिली यांना गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी ईश्वर यांनी कार्यालयात बोलावून त्यांना काही माहिती विचारली होती. त्यानुसार इरफान मिली आणि कलीम यांनी अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली.
मुस्लिम विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी या संस्थेकडून शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मदत करण्यात येते . ही रक्कम नेमकी कोणाकडून जमा केली जाते याबाबत अधिकारी तपास करत आहेत. दरम्यान औरंगाबाद कार्यालयात तील कागदपत्रांमध्ये बँक स्टेटमेंट इतर दस्तावेज अधिकाऱ्यांनी जप्त केला असून सर्व जप्त साहित्याचा पंचनामा करण्यात आला आहे. फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी सरकार वर टीका करून या गाडीच्या संदर्भात आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.