AurangabadNewsUpdate : विद्यापीठ आणि सर्व महाविद्यालये केंव्हा सुरु होणार ? विद्यापीठाचे परिपत्रक निघाले…

राज्य शासनाने ३१ डिसेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढविल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठातील सर्व विभागसुद्धा दि . 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहतील असे परिपत्रक विद्यापीठाच्या वतीने जरी करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या या परिपत्रकात म्हटले आहे की, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चा कायदा 1897 विहित केल्यानुसार केंद्र शासनाने निर्णय निर्गमित केलेले आदेश दिनांक 27 ऑक्टोबर 2020 व महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश दि. २९ऑकटोबर २०२० अन्वये निर्देशित केल्यानुसार यापूर्वी प्रस्तुत कायद्यांतर्गत covid-19 प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक परिस्थिती नुसार शासनाने 30 सप्टेंबर 2020 निर्गमित केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना व नियमांच्या अधीन राहून केंद्र शासन आणि राज्य शासनाने पारित केलेले आदेश नुसार मराठवाडा विद्यापीठाशी संबंधित शैक्षणिक संस्था 31 डिसेंबर पर्यंत बंद राहतील परंतु ऑनलाईन प्रक्रियेद्वारे देण्यात येणारी शिक्षण मात्र विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार यापुढेही नियमित सुरू राहील.
दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाने दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे विद्या परिषद देणे घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठाने 29 ऑक्टोबर 2020 रोजी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व संबंधितांनी आपल्या स्तरावरून सदरील वेळापत्रकानुसार ऑनलाईन द्वारे किंवा शक्य असेल अशा ठिकाणी ऑफलाइन द्वारे मिश्रित पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.
याप्रकरणी प्रतिबंधित क्षेत्रातील अध्यापक कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे महाविद्यालय किंवा कार्यालयामध्ये उपस्थित राहणे याबाबत सक्ती न करता ऑनलाइन उपस्थिती राहील. त्यानुसार शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे . या कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन औरंगाबाद , जालना , बीड आणि उस्मानाबाद जिल्हादंडाधिकारी यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे सर्व संबंधितांनी अनुपालन करावेत असेही या परिपत्रकात म्हटले आहे.