AurangabadNewsUpdate : महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंंंगाबाद : दिवसा शेतीला अखंडित विजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी ज्युबली पार्क येथील महावितरण कार्यालयावर रूमणे मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना संसर्ग होऊ न देण्यासाठी शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे, जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे,कृष्णा साबळे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आझम खान,तालुकाध्यक्ष संपत रोडगे,सुनील शिंदे, प्रकाश बोरशे, संतोष निकम, परभणीचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे यांच्यासह ७० ते ८० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.