AurangabadCrimeUpdate : विधवेवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी गजाआड

औरंंंगाबाद : दिराने आपल्या विधवा भावजयीवर गेल्या पाच वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.व कोर्टाने आरोपीला ४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रदीप काशिनाथ जाईबहार असे अटक आरोपीचे नाव आहे.
पीडित ४१ वर्षीय महिला श्रीनिकेतन कॉलनी येथे आपल्या दोन मुलांसह राहते. पीडितेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या दिराने पीडितेला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याशी सलगी करण्यास सुरूवात करून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. त्यावेळी पीडितेने त्यास नकार दिला होता. एप्रिल २०१५ मध्ये पीडित महिलेचे मुले घरी नसल्याची संधी साधून दिराने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच याची वाच्यता केल्यास तुझी समाजात बदनामी करेन अशी धमकी देत दिराने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी पीडित महिलेची मुलगी घरात असतांना दिराने तिच्यासोबतही अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार करणा-या दिराविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन सोनटक्के करीत आहेत.