MaharashtraNewsUpdate : विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीतील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे ६९.०८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. या निवडणुकीचं महत्वाचं वाषिष्ठ्य म्हणजे पहिल्यांदाच महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने समोरासमोर लढत आहेत. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडली. आज सकाळी आठ ते संध्याकाळी पाचच्या दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडली.
या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून या निवडणुकीचा निकाल परवा ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. आता महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील या सहा जागांचा निकाल काय असणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
हाती आलेल्या बातमीनुसार औरंगाबाद पदवीधरसाठी ६३.०५ टक्के, पुणे पदवीधरसाठी ५०.३० टक्के, नागपूर पदवीधरसाठी ५४.७६ टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ ८२.९१ टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघात ७०.४४ टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे ९९.३१ टक्के मतदान झाले, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. या सहाही मतदारसंघांत मुख्य लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी असून दोन्हीकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्याने आता लक्ष निकालाकडे लागले आहे. निकालानंतर दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे.
राज्यातील मतदानाची टक्केवारी
सांगली : मतदान टक्केवारी 4 वाजेपर्यंतची : पुणे पदवीधर 52.69 टक्के तर शिक्षक मतदार संघात 76.69 टक्के मतदानाची नोंद.
चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघासाठी 4 पर्यंत 54.16 टक्के मतदान
वर्धा : पदवीधर मतदारसंघाकरिता 4 वाजेपर्यंत 56 %टक्के मतदान
नागपूर पदवीधर मतदारसंघात दुपारी 4 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान.
जालना जिल्हा : 4:00 पर्यंत एकूण मतदान 55.00%.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2020 : दुपारी 4 पर्यंत अमरावती विभागात 68.65 टक्के मतदान.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक : परभणीत सकाळी 8 ते 4 दरम्यान 58.63 % मतदान.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चार वाजेपर्यंत 52.69 तर शिक्षक मतदारसंघासाठी 76.69 टक्के मतदान.
विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ सोलापूर : पदवीधर मतदार संघ 52.10% तर शिक्षक मतदार संघ 77.12%
महाविकास आघाडीचे उमेदवार
महाविकास आघाडीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी दिलेल्या पाच उमेदवारांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार रिंगणात आहेत.
अमरावती शिक्षक मतदारसंघ – श्रीकांड देशपांडे, शिवसेना
पुणे पदवीधर मतदारसंघ – अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे शिक्षक मतदारसंघ – प्रा. जयंत आसगांवकर, काँग्रेस
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस
नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजीत वंजारी, काँग्रेस
भाजपचे उमेदवार
भाजपच्या उमेदवारांना यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांबरोबर बंडखोर उमेदवारांशीही सामना करावा लागला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न दिल्याने रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली आहे. या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार पुढीलप्रमाणे होते.