CoronaMaharashtraUpdate : राज्यात 5753 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

राज्यात आज 5753 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4060 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1651064 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 81512 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.75% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 22, 2020
एकीकडे राज्यात कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी अधिक काळजी घेणे गरजेचे ठरले आहे. गेल्या काही दिवसांत दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा अधिक होती. राज्यात आज ५७५३ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ४०६० करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण १६,५१,०६४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, राज्यात एकूण ८१,५१२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.७५ टक्के झाले आहे.