AurangabadNewsUpdate : प्रायोगिक तत्वावर आठवडाभर दोन तास टू वे ट्राफिक – डाॅ.गुप्ता

औरंगाबाद -वर्दळीसाठी प्रसिध्द असलेल्या जालनारोडवरील मजबूती करणाचे काम सुरु असल्याने प्रायोगिक तत्वावर आकाशवाणी चौक २१ते २७ नोव्हेंबर या काळात रोज संध्याकाळी ६ते ८ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. त्या करिता नागरिकांना वाहने टू वे ट्राफिक नियमाप्रमाणे चालवण्याचे आदेश पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी जारी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.
येत्या २१ ते२७नोव्हेंबर या काळात वाहतूक वेगळ्या पध्दतीने हाताळण्यात येतआहे.या प्रकरणी कोणास हरकत असेल तर [email protected] या मेल आयडी वर संपूर्ण नाव पत्त्यासहित नोंदवाव्या असेही निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. प्रायोगिक तत्वावर वाहतूक हाताळतांना नागरिकांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा खुलासा सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात केला.