AurangabadCrimeUpdate : ताजी बातमी : दिवसा ढवळ्या फायरिंग करून अपहरण करणारे गजाआड, १२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद : ४ नोव्हेंबर रोजी औरंगाबादच्या देवनागरी भागात बांधकाम व्यावसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार करत त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करीत फरार झालेल्या चौघांना सातारा पोलिसांनी मध्यरात्री शहराच्या विविध भागातून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. त्यापैकी एका कडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
आफताब फेरोज तडवी(२२) आवेद उर्फ मुन्ना अखिल पठाण,(२५) मिर्झारोमेन फेरोज बेग(२२) आणि शेख जावेद गुलाम नबी(२६अंदाजे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरील पैकी आफताब कडून पोलिसांनी गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतूस जप्त केले.तर मिर्झा रोमेन बेग हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्यावर हर्सूल, सिडको, जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
कबुली जबाबात आरोपी आफताबने सांगितले की, २७ आॅक्टोबर रौजी जखमी नाझीम पठाण रउफ पठाण घरी जाऊन भांडला होता. तो राग मनात धरुन नाझीम पठाणवर आफताब ने साथीदारांना सोबत घेत त्याचे अपहरण करून त्याच्यावर गोळी झाडून त्याला जखमी केले होते . या कारवाईत पोलिस निरीक्षक सुरुंद्र माळाळे, एपीआय कर्हाळै, एएसआय मच्छींद्र ससाणे,व अन्य पोलिस कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.