Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिलदेव यांना हृदय विकाराचा धक्का

Advertisements
Advertisements
Spread the love

क्रिकेट विश्वातील मोठे नाव असलेले भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. वृत्तानुसार, कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यामुळे कपिल देव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हृदयात ब्लॉकेज असल्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या मते, याक्षणी कपिल देव धोक्याच्या बाहेर आहेत. त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून असून आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. क्रिकेटच्या इतिहासात कपिल देव यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 37 वर्षांपूर्वी पहिला वर्ल्ड कप जिंकला होता.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!