Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : बिहार निवडणूक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज आमने -सामने

Spread the love

पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज एकाच दिवशी आपल्या बिहार विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ करीत आहेत . पंतप्रधान मोदी उद्या सकाळी ११ वाजता बिहारमधल्या सासाराम इथे प्रचार सभेला संबोधित करतील. कोरोना काळात त्यांची ही पहिली जाहीर सभा असेल. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची एकत्रित सभाही उद्याच होणार आहे.

बिहारमध्ये 243 जागांसाठी २८ ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून  तीन आणि आणि सात नोव्हेंबर अशा  एकूण तीन टप्प्यात मतदान झाल्यानंतर १० ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे. बिहारच्या या निवडणुकीत बेरोजगारी हा मुख्य असून तेजस्वी यादव यांनी दहा लाख नोकऱ्यांचं आश्वासन दिल्यानंतर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात १९ लाख नोकऱ्यांचं आश्वासन दिलेलं आहे. पंतप्रधान मोदी बिहारच्या रणधुमाळीत एकूण बारा जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. उद्या राहुल विरुद्ध मोदी अशी लढाई बिहारमध्ये पाहावयास मिळणार आहे.

बेरोजगारीच्या मुद्द्याबरोबरच भाजपने आजच आपल्या जाहीरनाम्यात प्रत्येक बिहारवासियांना मोफत कोरोना लसीची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता आजच्या  सभेत पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे लक्ष असेल. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला  आतून भाजपचा पाठिंबा आहे का अशी चर्चा बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याबाबत  मोदी पक्षाची भूमिका स्पष्ट करणार का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. दरम्यान अमित शाहांची प्रकृती हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय असला तरी अमित शाह भाजपच्या मिशन बिहारसाठी स्वत: मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले आहे. बिहारमध्ये  अमित शाह यांच्या किमान १२ रॅली होणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे. यातल्या काही रॅली व्हर्चअुल असतील, पण किमान ९ रॅलीत  ते प्रत्यक्षपणे संबोधित करतील असे पक्षाकडून सांगितलं जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!