AurangabadCrimeUpdate : धक्कादायक : वडिलांच्या प्रेयसीवर कुऱ्हाडीचे घाव , मुलासह तिघांना अटक

औरंगाबाद -वडिलांच्या प्रेयसीवर कुर्हाडीने वार खून करणार्या तिघांना ग्रामीण गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासात बेड्या ठोकल्या.या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आशा शेषराव गांगुर्डे(३२) असे मयत महिलेचे नाव आहे. तर रवी बाळू वाघ (२३),विशाल रमेश पवार (१९) सुनिल सुभाष गांगुर्डे (१९) तिघेही रा.वडनेर अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींपैकी रवी वाघ याचे वडिल बाळू वाघ यांचे आशा गांगुर्डे हिच्याशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वडिलांच्या प्रेयसीमुळे घरात होणार्या भांडणाला कंटाळून मुलाने दोन मित्रांना सोबंत घेऊन काल दुपारी(२२ रोजी )प्रेयसीवर कुर्हाडीने व कोयत्याने घाव घालून खून केला. आरोपींनी मयत महिलेला शिवना नदीकाठी बोलावून घेतले व नंतर खून केला. या कारवाईत पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय संदीप सोळंके, पोलिस कर्मचारी शेख नदीम, संजय भोसलै, गणेश गांगवे, योगेश तरमाळे यांनी पार पाडली