AurangabadCrimeUpdate : ५० हजाराची लाच स्वीकारली , सिटी चौक पोलीस ठाण्याच्या फौजदाराला अटक

औरंगाबादच्या सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुन्ह्यामध्ये एका व्यक्तीला चौकशीसाठी बोलावून सहआरोपी न करण्यासाठी संशयित आरोपींकडूनच ५० हजाराची लाच मागितली. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून संबंधित फौजदाराला अटक केली. संतोष रामदास पाटे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबादमधल्या सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्या बाबत तक्रारदार यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी फौजदार पाटे यांनी संशयितांकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली दिली होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला व ५० हजार रुपयांची मागणी करताना व ती स्वीकारल्याचे निष्पन्न होताच पथकाने छापा मारून स्वीकारलेली लाचेची रक्कम जप्त केली. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
याविषयीची अधिक माहिती अशी की काही दिवसापूर्वी तक्रारदार यांच्या दुकानावर छापा टाकून पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाने गुटखा जप्त केला होता याप्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष पाटे करीत होते. या प्रकरणात तक्रारदार यांना सहा आरोपींना करण्यासाठी फौजदार पाटील यांनी त्यांच्याकडे ५० हजार रुपये लाच मागितली त्यानुसार तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली होती. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे , अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार आणि उपाधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत आणि त्यांच्या कर्मचार्यांनी बुधवारी रात्री उशिरा हा सापळा लावला त्यानुसार आरोपी फौजदार पाटे यांना ५० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे.