AurangabadNewsUpdate : खाजगी इमारतींमधील पोलिस ठाण्यांसाठी स्वतःची जागा आणि आयुक्तालयाच्या हद्द वाढीसाठी चालू आहेत पोलीस आयुक्तांचे प्रयत्न

औरंगाबाद- पोलिसआयुक्तालयाच्या हद्दीतील खाजगी इमारती मधे असलेले पोलिस ठाणे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयासाठी सरकारी जागांचा शोध सुरु करण्यात आला आहे.तसा प्रस्ताव तयार करुन शासनाला लवकरंच पाठवण्याची प्रक्रिया सुरु करंत आहोत अशी माहिती पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी “महानायक” शी बोलतांना दिली.
शहरातील पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तालयाशी संबंधित कोणत्या महत्वाच्या बाबी प्रलंबित आहेत याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांकडून आढावा घेतला.पोलिसआयुक्तालयाच्या हद्दीत करमाड, शेंद्रा, बिडकीन या पोलिस ठाण्याचा समावेश होण्यासाठी या पूर्वीच्या पोलिसआयुक्तांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याचा पाठपुरावाकरुन पोलिसआयुक्तालयाची हद्द वाढविण्यात येणार आहे असेही डाॅ.गुप्ता म्हणाले.
पोलिसआयुक्तालयात सध्या परिमंडळ एक आणि दोन मधे मधील पोलिसआयुक्तालयाच्या मालकीच्या नसलेल्या एकूण १६ इमारती आहेत.
खाजगी व्यक्तींकडून भाडे तत्वावर एकूण ७ इमारती आहेत. महापालिकेकडून भाडेतत्वाव र३ तर एक महापालिकेने वापरण्यास दिलेली एक तर पोलिसआयुक्तालयाच्या ११ इमारती आहेत. त्यापैकी परिमंडळ १ मधील सिटीचौक, क्रांतीचौक, छावणी, वाळूज औद्योगिक पोलिस ठाणे, वाळूज, शहरविभाग सहाय्यक पोलिस आयुक्त इमारत, छावणी विभाग सहाय्यक पोलिसआयुक्त इमारत,तर परिमंडळ दोन मधील सिडको, सिडको औद्योगिक, जिन्सी आणि मुकुंदवाडी पोलिस ठाणे या ११ इमारती पोलिसआयुक्तालयाच्या मालकीच्या आहेत. तर मनपाकडून भाडेतत्वावर घेतलेले उस्मानपुरा पोलिस ठाणे, सहाय्यक पोलिस आयुक्त सिडको विभाग इमारत आणि परिमंडळ दोन आणि एक यांचे कार्यालय,वेदांतनगर पोलिस ठाणे, यांचा समावेश होतो. तर खाजगी व्यक्तींकडून बेगमपुरा, दौलताबाद, हर्सूल, जवाहरनगर, सातारा, पुंडलिकनगर पोलिस ठाणे तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग उस्मानपुरा या इमारती भाडेतत्वावर घेतलेल्या आहेत.