Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यासाठी दिलासादायक बातमी , कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

Spread the love

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे . गेल्या  २४ तासात १२ हजार ९८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ११ लाख ६२ हजार ५८५ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात १० हजार २४४ नवीन आढळले आहेत त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या १४ लाख ५३ हजार ६५३ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये २६३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात ३८ हजार ३४७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट हा ८० टक्के झाला आहे. आत्तापर्यंत ७१ लाख ६९ हजार ८८७ पाठवण्यात आलेल्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख ५३ हजार ६५३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला २२ लाख १६० लोक हे होम क्वारंटाइन आहेत. तर २६ हजार ७४९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्याच्या घडीला २ लाख ५२ हजार २७७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात १० हजार २५४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४ लाख ५३ हजार ६५३ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये २६३ मृत्यूंची नोंद झाली आहे त्यातले १३३ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ५८ मृत्यू मागील आठवड्यातले आहे. तर उर्वरित ७२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत, अशीही माहितीही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!