Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangRapeand Murdercase : वाढता जनक्षोभ पाहता मुख्यमंत्री योगी यांनी उगारले निलंबनाचे शास्त्र, जिल्हाधिकाऱ्यावर मात्र कारवाई नाही

Spread the love

उत्तर प्रदेशच्या हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक कारवाई करत हाथरसच्या वादग्रस्त पोलीस अधीक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. प्राथमिक तपासाच्या आधारावर मुखमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही कारवाई केली आहे. तर पीडित कुटुंबाला धमकावल्याचा आरोप असलेले जिल्हाधिकारी प्रवीणकुमार लक्षकार यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. हे प्रकरण हाताळण्यावरून जिल्हा प्रशासन आणि सरकारविरुद्ध केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे लक्षात आल्याने  हाथरस घटनेत योगी सरकारने हि मोठी कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. एसपी, डीएसपी आणि हाथरसच्या पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिस ठाण्यातील सर्व पोलिसांची नार्को पॉलिग्राफ चाचणी केली जाणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर काहींवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी, फिर्यादी, प्रतिवादी या सर्वांची पॉलिग्राफी चाचणीही  केली जाणार आहे. ज्या प्रकारे  हाथरस जिल्हा प्रशासनाने हे संपूर्ण प्रकरण हाताळले आहे त्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठी डोकेदुखी झाली आहे.

विशेष म्हणजे या सर्व  प्रकरणात सुरवातीपासूनच प्रशासनाचा  हलगर्जीपणा दिसून  येत आहे. हा वाद न थांबल्याने थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून या प्रकरणी हस्तक्षेप करण्यात आला. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांबाबत सविस्तर रिपोर्ट मागवला गेला. या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मनस्ताप झाल्याने हाथरसचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कुठल्याही क्षण निलंबित केलं जाईल, अशी चर्चा होती. पण अजून जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार लक्षकार यांची भूमिका सुरवातीपासूनच संशयास्पद आहे. मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “मुलगी करोनाने मेली असती तर नुकसान भरपाई मिळाली असती का? तसंच मीडियावाले निघून जातील, पण प्रशासन इथेच आहे, अशा धमक्या त्यांनी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता आणि त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!