AurangabadPoliceNewsUpdate : व्हिजिबल पोलिसिंग करा, नागरिकांशी सुसंवाद साधा , पोलिस आयुक्तांचे आदेश

औरंगाबाद – रोज संध्याकाळी ७ते ९ या वेळेत पोलिस निरीक्षक ते पोलिस कर्मचार्यांनी आपापल्या हद्दीत पायी फिरुन गस्त घालायची आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवायचे असे आदेश पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी जारी केले. त्यामुळे आज पासुन संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत रस्त्यावर गस्त घालतांना दिसंत आहेत. संध्याकाळचा फेरफटका, किंवा किरकोळ कामासाठी बाहेर पडलेल्या जेष्ठ नागरिकांशी संवाद साधतांना दिसंत आहेत. व्यापार्यांना येणार्या अडचणींची चर्चा करतांना दिसत आहेत. या पूर्वीचे पोलिस आयुक्त यांनी कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून शहर पोलिसांची वेगळी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला होता त्या पेक्षा वेगळा प्रयत्न आज डाॅ.निखील गुप्ता करंत आहेत.शहरात पोलिसांचा वचक वाढवण्यासोबंतच नागरिकांशी सुसंवाद साधला जात आहे.
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून उलटसुलट चर्चा
राज्यातील गृह खात्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांवरून राज्य सरकार आणि पोलीस महासंचालक यांच्यातील मतभेदांचा उडालेला भडका अद्याप कायम आहे. याचा परिणाम होऊन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल महिनाभराच्या रजेवर गेले असल्याचे वृत्त आहे. मात्र जयस्वाल हे स्वतःहून रजेवर गेले की त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रजेवर पाठवले याबाबत मंत्रालयात उलट-सुलट चर्चा आहे.
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू राहिल्यामुळे यंदा पोलिसांच्या मे महिन्यात होणार्या सर्वसाधारण बदल्या होऊ शकल्या नाहीत. सुरूवातीला राज्य सरकारने या चालू आर्थिक वर्षात अर्थात ३१ मार्च २०२१ पर्यंत पोलिसांच्या बदल्या करायचा नाहीत, असा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर राज्य सरकारने स्वतः निर्णय फिरवला आणि एकूण बदल्यांच्या १५ टक्के बदल्यांना मान्यता देण्यात आली. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय वशिलेबाजीचा आरोप झाल्याने विरोधकांनी बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची आवई उठवली. त्यामुळे कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक पोलिस अधिक अशी ख्याती असलेले महासंचालक जयस्वाल यांनी या बदल्या केल्या नाहीत. मात्र त्यानंतरही राज्य सरकारच्या आग्रहामुळे पोलीस महासंचालकांनी अत्यावश्यक असलेल्या बदल्या व पदोन्नत्या केल्या. मात्र त्यानंतरही राज्य सरकारच्या आग्रहामुळे पोलीस महासंचालकांनी अत्यावश्यक असलेल्या बदल्या व पदोन्नत्या केल्या. मात्र त्यानंतरही अद्याप २५ ते ३० वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांना विना पोस्टिंग ठेवण्यात आले.
बलात्काराच्या आरोपावरून गुन्हा दाखल
इस्टेट एजंट जायबा गायकवाड (५५)विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल. फायनान्स कंपनीत काम करणार्या (३०) विवाहितेने २५जुलै 20 रोजी शहानूरमियाॅं दर्गा परिसरात नेऊन शोषण केले होते.अशी तक्रार गेल्या ४ वर्षांपासून नवर्यापासून वेगळी माहेरी राहते दोन मुली आहेत नवीन फ्लॅट बघण्यासाठी कैलासनगर परिसरात आली होती. तिथे जायबा गायकवाड भेटला.ओळख वाढली संबंध जुळले आणि बलात्काराचा गुन्हा जवाहरनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला.पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील करंत आहेतअधिकार्यांना विना पोस्टिंग ठेवण्यात आले.