AurangabadCrimeUpdate : आलिशान कारमधुन गांजाची तस्करी, चौघे गुन्हे शाखेच्या जाळ्यात, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंंंगाबाद : आलिशान इनोव्हा कारमधुन गांजाची तस्करी करणा-या चार जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई गुरूवारी (दि.१) पहाटेच्या सुमारास मयुरपार्क ते हर्सूल रोडवर करण्यात आली. पोलिसांनी इनोव्हा कारमधुन ४९ बॅगमध्ये भरलेला १०६ किलो गांजा जप्त केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल छगन तामचीकर (वय ४८), शेरसिंग अमु इंदरेकर (वय ३६) दोघेही रा.बलुची गल्ली, नारेगाव व दोन महिला एका इनोव्हा कारमधुन गांजाची तस्करी करीत असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, अमोल देशमुख, सहाय्यक फौजदार शेख नजीर, जमादार सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, ओमप्रकाश बनकर, संजयसिंह राजपुत, शिवा बोर्डे, रविंद्र खरात, अमर चौधरी, धर्मराज गायकवाड, सुर्यवंशी, नितीन देशमुख, नितीन धुळे, संजीवनी शिंदे आदींनी मयूरपार्वâ चौक ते सुपर-३० स्वूâलजवळ सापळा रचून इनोव्हा कार क्रमांक (एमएच-०३-बीसी-२७१३) अडवली. पोलिसांनी कारमधुन विशाल तामचीकर, शेरसिंग इंदुरेकर यांच्यासह दोन महिलांना ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता कारमधुन ५ लाख ३१ हजार ५०० रूपये विंâमतीचा तब्बल १०६ किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी ५ लाख ३१ हजार ५०० रूपये किमतीचा गांजा व इनोव्हा कार असा एवूâण १५ लाख ३१ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.