AurangabadCrimeUpdate : नशेच्या गोळ्या विकणारा पोलिसांच्या जाळ्यात तर ” त्या ” ड्रग्स प्रकरणात आणखी तिघांना अटक

औरंंंगाबाद : नशेच्या गोळ्यांचा अवैधरित्या साठा करून विक्री करणाNया आवेज खान जावेद खान (वय २०, रा.बायजीपुरा) याला गजाआड केले. आवेज खान याच्या ताब्यातून पोलिसांनी ७५ हजार रूपये विंâमतीच्या नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी बुधवारी (दि.३०) कळविली आहे.
नायट्रोसन-१० नावाच्या नशेच्या गोळ्यांचा साठा करून विक्री करणारा आवेज खान जावेद खान हा मुवुंâदवाडी रेल्वेस्टेशनजवळील देशी दारूच्या दुकानाजवळ आला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना २९ सप्टेंबर रोजी मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, जमादार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, जालींदर मांन्टे, रवि जाधव, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, दिपक जाधव, विलास डोइफोडे, माया उगले आदींच्या पथकाने सापळा रचून आवेज खान याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याजवळील बॅगची झाडती घेतली असता ७५ हजार रूपये विंâमतीच्या १५ बॉक्स नशेच्या गोळ्या त्याच्याजवळ मिळून आल्या. याप्रकरणी आवेज खान याच्याविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत.
” त्या ” ड्रग्स प्रकरणात आणखी तिघे अटक
औरंगाबाद – वेदांतनगर पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात आणखी तिघांना अटक केली.सदर आरोपीकडून अमली पदार्थ घेणारे 1) मोहम्मद चाऊस पिता सालाम चाऊस राहणार बारी कॉलनी औरंगाबाद 2) फैजान खान औरंगाबाद यांना आज रोजी विचारपूस करून सहभाग दिसून आल्याने संध्याकाळी ८वाजता वाजता अटक केली तर आरोपी 1) आशिक आली पिता मुसा कुरेशी राहणार कुर्ला वेस्ट 2) नूरोद्दीन पिता बद्रोद्दिन सय्यद राहणार बांद्रा न्यायालयाने दि 05 आॅक्टोबर पर्यंत PCR दिला आहे. पुढील तपास पैलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांतनगर पोलिस करंत आहेत.