AurangabadCrimeUpdate : मौज मजा करण्यासाठी जावई ड्रगसह आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला….

नियंत्रण कक्षाने पकडून केले वेदांतनगर पोलिसांच्या हवाली
औरंगाबाद – सासुरवाडीत बायको व मुलांना भेटण्यासाठी आलेल्या इसमाला त्याच्या सवंगड्यासोबत ६३ हजारांच्या अमली पदार्थासहित वेदांत नगर पोलिसांनी आज संध्याकाळी ६.३०वा अटक केली.
नरोद्दीन पिता बद्रोद्दीन सय्यद(४१) रा. भारतनगर बांद्रा (पू) व आशिकअली पिता मुसा कुरेशी(४१) एल.एस.बी. मार्ग कुर्ला (प) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांनी मुंबई- औरंगाबाद प्रवासासाठी वापरलेली जीप शहरातील रहिवासी कलीम कुरेशी यांची असल्याचे पोलिसांनी सांगितले . सकाळी १०च्या सुमारास गस्तीवरील पोलिसांनी खबर्याच्या माहितीवरुन आरोपींना ताब्यात घेतले.नरोद्दीन हा पट्टीचा ड्रग अॅडिक्ट आहे. ताब्यात घेतल्यानंतर ड्रग्ज न घेतल्यामुळे त्याला खूप अस्वस्थ वाटंत होते. जिन्सी परिसरातील कलीम कुरेशीचा तो मेव्हणा आहे. त्याची बायको आणि मुले कन्नड ला असल्याचे नरोद्दीनने पोलिसांना सांगितले . लाॅकडाऊनच्या काळात कुरेशी यांचा माणूस बासित कडून नरोद्दीनने जीप मुंबईला नेली होती. ती जीप परत देण्यासाठी नरोद्दीन शहरात आला होता. पण तो ड्रग्स अॅडिक्ट असल्यामुळे कलीम कुरेशी यांच्या समोर जाण्यास घाबरतो.असेही त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.
दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १३ग्रॅ.मेॅफेडोन आणि २८ग्रॅ.१००मि.ग्रॅ चरस पोलिसांनी जप्त केले.या दोन्ही अमली पदार्थांची किंमत ६३हजार १०० रु. आहे. कारवाई झाल्या नंतर जप्त केलेले अमली पदार्थ फाॅरेन्सिक लॅब मधून तपासणी करुन घेतल्यावर गुन्हा दाखल आणि अटकेची कारवाई पार पाडली.वरील कारवाई पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहूल रोडे, पीऐसआय भदरगे, एएसआय सय्यद हनीफ, कलंदर पठाण यांनी सहभाग घेतला होता.