AurangabadCrimeUpdate : जीवे मारण्याची धमकी देत ठेकेदाराचा महिलेवर अत्याचार

औरंंंगाबाद : तुझ्या पतीला आणि तुला जीवे मारून टाकेन अशी धमकी देत ठेकेदाराने नारेगावातील ३० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केला. ठेकेदाराने अत्याचार केल्याची घटना ५ आणि १० सप्टेंबर रोजी घडली असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिली.
मधुसूदन सरकार असे महिलेवर अत्याचार करणा-या ठेकेदाराचे नाव आहे. पीडित महिलेचा पती मधुसूदन सरकार याच्याकडे नोकरीला आहे. ५ सप्टेंबर रोजी पीडित महिला घरी एकटी असतांना मधुसूदन सरकार याने तिच्या घरी जावून तीला तुझ्या पतीला आणि तुला जीवे मारून टाकेन अशी धमकी देत घराला आतून कडी लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी पुन्हा मधुसूदन सरकार याने पीडितेवर लैंगिक अत्यचार केला होता. ठेकेदाराकडून होत असलेल्या अत्याचाराला वंâटाळलेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मधुसूदन सरकार याच्याविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक मीरा लाड करीत आहेत.
——————————————————-
दुचाकीचा अपघात होवून जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू
औरंंंगाबाद : भरधाव दुचाकी स्लिप होऊन दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनील दत्ता खाडे (वय ३२, रा. न्यू बालाजी नगर) असे अपघातात जखमी होऊन मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सुनील खाडे हा ३१ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकाकडून भरधाव वेगाने दुचाकीवर आपल्या घराकडे जात होता. जालना रोडवरील गुरुद्वारा कमानीकडे वळत असताना अचानक दुचाकी स्लिम होऊन दूरवर फरफटत जावून तो दुचाकीसह उड्डाणपुलाजवळ असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळून गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या सुनील खाडे याच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू असतांना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक शशिकांत तायडे करीत आहेत.