AurangabadNewsUpdate : लालबागचा राजा मंडळाकडून कोरोना शाहिद पोलिसांना प्रत्येकी एक लाखाची मदत आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान

मुंबईच्या लालबागचा राजा मंडळाकडून कोरोना शाहिद पोलिसांना प्रत्येकी एक लाखाची मदत आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येत आहे. ज्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर त्यांना मुंबई येथील लालबागचा राजा यांच्याकडून त्यांच्या मृत्यू पावलेल्या पत्नी व मुलांना एक लाख रुपयाचा धनादेश देणार होते. हि माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी वेळोवेळो पाठपुरावा केल्यामुळे कोरोनामुळे मयत झालेले सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय साहेबराव पवार यांची पत्नी नामे विमल साहेबराव पवार व मुलगा अजय पवार यांना लालबागचा राजा यांनी एक लाख रुपयांचा धनादेश दिलेला आणि सन्मानचिन्ह देण्ययात आले. दि. ११ जुलै २०२० रोजी कोरोना निधन झाले होते.
लालबाग सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने सुरू झालेल्या आरोग्योत्सव अंतर्गत मुंबई व महाराष्ट्रातील शहीद पोलिस कर्मचारी बांधवांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने दि.२७ ऑगस्ट पर्यंत एकूण ७० कुटुंबियांना शौर्यचिन्ह आणि प्रत्येकी एक लाख रूपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये दि.3 ऑगस्टला 7 कुटुंबियांना, दि. 22 ऑगस्टला 9 कुटुंबियांना, दि.23 ऑगस्टला 11 कुटुंबियांना, दि.24 ऑगस्टला 11 कुटुंबियांना, दि.25 ऑगस्टला 13 कुटुंबियांना, दि.26 ऑगस्टला 10 कुटुंबियांना, दि.27 ऑगस्टला 09 कुटुंबियांना, सन्मानित करण्यात आले आहे. तसेच दि.31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुंबई व महाराष्ट्र पोलिसदलातील ऊर्वरित शहीदांच्या कुटुंबियांना (महाराष्ट्र पोलिसांकडून १११ जणांची यादी मंडळाला मिळाली आहे) प्रत्येकी एक लाख रूपयांचा धनादेश व शौर्यचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
दरम्यान गलवान खोऱ्यात देशासाठी धारातीर्थी पडलेल्या २२ सैनिकांच्या कुटुंबियांना मंडळातर्फे १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकी ₹२लाख देण्यात आले आहेत. तसेच त्यांचे शौर्यचिन्ह भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने आधीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आले आहे. याशिवाय २२ ऑगस्ट पासून मंडळातर्फे रक्तदान व प्लाज्मा दान चालू आहे. दररोज सरासरी 800 पेक्षा जास्त रक्तदान होत आहे. तसेच 160 जणांनी प्लाज्मा दान केला आहे व अन्य 450 जणांनी मंडळाकडे यासाठी नावे नोंदविली आहेत.हे रक्तदान व प्लाझ्मादान दि.31ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे.