Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : NEETआणि JEE परीक्षा थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेचा ” या ” मुख्यमंत्र्यांचा निर्धार

Spread the love

काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या बैठकीत  भाजपविरोधी सात मुख्यमंत्र्यांनी मोदी  सरकारवर हल्ला बोल करताना एकत्रित काम करण्याचा संकल्प केला . कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत एनईईटी आणि जेईईची परीक्षा घेतल्यास देशात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती आहे. याला केंद्र सरकार कारणीभूत असेल, असा हल्लाबोल पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी केला. तर केंद्र सरकारकडे जाण्यासाठी आपल्याकडे आता वेळ राहिलेला नाही. आपण जेईई आणि एनईईटी परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात जाण्याची गरज असल्याचे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

दरम्यान राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने NEET आणि  JEE परीक्षेचे वेळापत्रक जारी केले आहे . त्यानुसार दि. १ ते ६ सप्टेंबरदरम्यान तर Neet परीक्षा १३ सप्टेंबर रोजी  घेतली जाणार आहे.

देशातील विविध प्रश्नासंदर्भात आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात सात गैर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी हे उपस्थित होते. जीएसटी, एनईईटी आणि जेईईच्या मुद्द्यावर ही बैठक बोलावण्यात आली होती. कोरोना व्हायरसच्या काळात  परीक्षा घेणं धोकादायक आहे. यामुळे विद्यार्थ्यांनाही करोनाची लागण होऊन रुग्ण वाढण्याची भीती आहे. असं झालं तर त्याला केंद्र सरकार जबाबदार असेल. या मुद्द्यावर आपण केंद्र सरकारविरोधात एकजुटीने लढलं पाहिजे, असं नारायणसामी म्हणाले.

दरम्यान सर्व राज्यांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात  एनईईटी आणि जेईई परीक्षांच्या मुद्द्यावर पुनर्विचार याचिका केली पाहिजे, असे  पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनामुळे राज्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आतापर्यंत आम्ही ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. आणखी खर्च राज्याला अजिबात परवडणारा नाही. दुसरीकडे केंद्र सरकारडून जीएसटीचा परतावाही मिळत नाही. यामुळे आपण केंद्र सरकारविरोधात एकजुटीने पुढे आलं पाहिजे, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

या दोन्हीही परीक्षांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी आपण आधी पंतप्रधान मोदींसमोर हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे, असं मत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या बैठकीत मांडलं. केंद्र सरकारने गेल्या चार महिन्यांपासून जीएसटीचा निधी न दिल्याने राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आणि भीतीदायक झाली आहे, असं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. जेईई आणि एनईईटीच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येत आहेत. करोना संकटाच्या स्थितीत विद्यार्थ्यांचा जीवा का धोक्यात घालायचा? आम्ही यासंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. पण त्यावरू अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही, असं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!