AurnagbadaNewsUpdate : भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

औरंंंगाबाद : भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी ( दि.२५) सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते नगर महामार्गावरील ए.एस.क्लब चौकात घडला. सुरेश योगानंद झा (वय ३२, रा. जुना मोंढा परिसर, औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश झा हा तरुण मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते नगर महामार्गाने वाळूजकडे दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीएक्स-३१९५) वर जात होता. ए.एस.क्लब चौकात झा याच्या दुचाकीस पाठीमागून येत असलेल्या वंâटेनर क्रमांक (डब्ल्यूबी-११-डी-८६१४) ने धडक दिली. कंटेनरची धडक बसल्यावर सुरेश झा याचा तोल जाऊन खाली पडला, नेमके त्याचवेळी कंटेनरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती मिळताच वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार व त्यांच्या सहकाNयांनी घटनास्थळी धाव घेऊन सुरेश झा याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत दाखल केला. तसेच अपघातग्रस्त वाहने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात जमा केली.