AurangabadCrimeUpdate : कुरीयर कंपनीची 26 लाखाची रक्कम फिर्यादीस केली परत तर दुसऱ्या एका प्रकरणात डॉक्टर आणि पोलिसांनी दाखवली माणुसकी

औरंगाबाद : नगर येथे अपघात झाल्याचा बनाव करत क्विक कुरियर कंपनीचा बीड येथील शाखा प्रमुखाने ग्राहकांकडून कॅश ऑन डिलिव्हरीनुसार मिळालेले तब्बल 26 लाख 93 हजार रुपये हडप केले होते. या प्रकरणी सिटी चौक पोलिसात 14 जुलै रोजी गुन्हा नोंद होता. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपी श्रीकांत संदेश धिवारे रा. एन. 6, औरंगाबाद व शिवाजी जोगदंड रा. बीड यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 26 लाख रुपये जप्त केले होते. सिटी चौक पोलीस ठाणे निरीक्षक संभाजी पवार यांच्या हस्ते फिर्यादी राजेश इंद्रवदन ठक्कर रा. गारखेडा परीसर यांना रोख रक्कम सुपूर्त करण्यात आली.
ठक्कर यांच्या क्विक कुरियर सर्व्हिसेस कंपनीत पानदरीबा येथे काम करणारा व बीड येथील शाखा संभाळणारा श्रीकांत धिवारे व शिवाजी जोगदंड यांनी ग्राहकांकडून कॅश ऑन डिलिव्हरी देवुन जमा झालेली रोख रक्कम 26 लाख 93 हजार रुपये मुळ मालकाकडे जमा न करता दिनांक 11 जुलै रोजी बीड ते अहमद नगर रोडवर अपघाताचा बनाव करुन कोणीतरी पळवल्याची माहीती मालकाला दिली होती. त्यावरुन गुन्हा नोंद होवुन पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोउपनि पाथरकर यांचे कडे देण्यात आला होता. गुन्ह्यात सखोल तपास करुन सदर गुन्ह्यात कुरीयर मध्ये काम करणाऱ्या श्रीकांत धिवारे यास अटक करुन त्याचे ताब्यातुन व त्यास मदत करणारा शिवाजी जोगदंड रा. बीड असे त्यांच्या ताब्यातुन गुन्ह्यात अपहार केलेली रोख रक्कम 26 लाख रुपये हस्तगत करुन गुन्ह्यात जप्त केली होती. गुन्ह्यातील जप्त रोख रक्कम 26 लाख रु. ही फिर्यादी ठक्कर यांना परत देणे बाबत न्यायालयाचे आदेश दिले होते. त्यानुसार रोख रक्कम ही दिनांक शुक्रवारी सिटी चौक पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या हस्ते कंपनी मालक राजेश ठक्कर यांना दिली आहे.
या गुन्हा उघडकीस आणण्यास, गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करण्यास व गुन्ह्यातील रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उप आयुक्त निकेश खाटमोडे, सपोआ शहर विभाग हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रविण पाथरकर, यांच्यासह अप्पासाहेब देशमुख, संजय नंद, संदीप तायडे, बालाजी तोटेवाड, माजीद पटेल यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक प्रविण पाथरकर हे करीत आहेत.
चोरी केलेला ऐवज पुंडलिकनगर पोलिसांनी परत मिळुन दिल्याबाबत डॉ.गांधी यांनी मानले अभार
औरंगाबाद : आकाशवाणी सिग्नल समोरील रंजितनगर परिसरात डॉ.अक्षय गांधी यांच्या हॉस्पिटलमधून चोरी गेलेला एक लाख रुपये किंमतीचा ऐवज परत मिळवून दिल्याबद्दल पुंडलिक नगर पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या परिचरिकेच्या मुलाने हे साहित्य लंपास केले होते. त्या बालकाला डॉ. गांधी यांनी माफ करून सपोनि घनश्याम सोनवणे यांनी समुपदेशन करून भविष्यात असे कृत्य करू नये अशी समज दिली.
डॉ. गांधी हे हॉस्पिटलच्या ठिकाणी ते कुटूंबासह वरचे मजल्यावर राहतात. त्याचेकडे त्याच्या ओळखीची परिचारीका ऑगस्ट 2020 मध्ये आली. सोबत तिचा मुलगा वय-17 वर्षे याला दवाखान्यात काम शिकण्यासाठी म्हणून विनामूल्य तत्वावर अनुभवासाठी ठेवा अशी विनंती केल्याने समव्यवसायीक व प्रमाणिक परिचरिकेचे ऐकून डॉ.गांधी यांनी तिच्या मुलाला अनुभवासाठी हॉस्पीटल मध्ये काम करण्याची संधी दिली. त्या मुलाने दिलेल्या संधीचे सोने करण्याऐवजी त्याचेच हॉस्पीटल मधुन एक लिनिओ कंपणीचा लॅपटॉप , एक सोनी कंपनीचा महागडा कॅमेरा, एक महागडी मनगटी घड्याळ व जुने चलनी नाणे असा ऐवज चोरी केला होता. ही बाब डॉ.गांधी याच्या लक्षात आल्यानंतर त्यानी करोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे पो.स्टे जिन्सी येथे तक्रार दिली नव्हती. योगायोगाने पोस्टे पुडंलीकनगर येथे गु.र.नं.110/2020 कलम 461,380 भा.द.वी च्या तपासामध्ये हा बालक पकडा गेल्यामुळे डॉ.गांधी यांच्या हॉस्पीटलमधुन चोरी गेलेला अंदाजे एक लाख रुपयाचा ऐवज तपास अधिकारी विकास खटके यांनी हस्तगत केला. ही बाब डॉ.गांधी यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्या मुलाच्या आईच्या प्रमाणिकपणामुळे व मुलाच्या भावी आयुष्याचा विचार करुन मुलाविरुध्द तक्रार देण्यास असमर्थता दाखवुन कृतघ्न भावनाने त्यास माफ केले. त्यामुळे पुंडलिक नगर पोलिसांनी डॉ. गांधी यांची भावाना लक्षात घेवुन त्यांच्या हॉस्पीटल मधुन चोरी गेलेला एक लाखाचा ऐवज त्यांना परत दिला. त्यांच्या या सहनशिलता व प्रमाणिक भावनेबाबत आम्ही त्यांचे कौतुक केले त्यांनी सुध्दा त्यांचा चोरी गेलेला ऐवज विना तक्रार परत मिळाल्याबाबत पुंडलिकनगर पोलीसांचे पुष्पगुच्छ देवुन अभार मानले.
दरम्यान या विधी संघर्षग्रस्त बालकाचे प्रत्येक शनिवारी मानसोपचार तज्ञ डॉ.रचना पौळ व डॉ.संदीप शिसोदे यांच्याकडुन समोपदेशन करुन घेण्याचे सुध्दा आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणुन नियोजन केले आहे. या बालकावर यापुढे विशेष लक्ष देण्याचा त्याच्या मातेला सल्ला दिला. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, यांच्या संकल्पनेतुन साकार होत असलेल्या कम्युनिटी पोलीसिंग मुळेच व उपायुक्त डॉ.राहुल खाडे व सपोआ रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना प्रेरणा मिळत आहे.