AurangabadNewsUpdate : लायन्स मिडटाऊन मेडिकल सर्विसस ट्रस्टच्या वतीने निःशुल्क डायलिसिस

औरंगाबाद : लायन्स मिडटाऊन मेडिकल सर्विसस ट्रस्टच्या वतीने आज पोळा सणाच्या निमित्ताने आयोजित निःशुल्क शिबिरात 12 रुग्णावर यशस्वीरित्या डायलिसिस करण्यात आले दरम्यान या सत्कार्यासाठी समाजातील साधन नागरिकांनी आपला मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन करण्यात आले.
प्रारंभिक सर्व रुग्णांची तपासणी डॉ. शेखर शिरडोनकर यानी केली तर डॉ. राहुल जैन व टेकनेशियन ज्ञानेश्वर गायकवाड़ यांनी डायलिसिस ची प्रक्रिया पार पाडली.
या प्रसंगी लॉयन्स मिडटाउन मेडिकल सर्विसस ट्रस्टचे चेयरमन महावीर पाटनी यानी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्प विषयी सर्व माहिती दिली. डिस्ट्रिक्ट कैबिनेट सेक्रेटरी लायन राहुल औसेकर यानी लॉयन्स मिडटाउन द्वारा सुरु असलेल्या या प्रकल्पाची प्रशंसा करत या प्रकल्पा ला सर्व लॉयन्स सदस्यांसोबत नागरिकांनी या कार्यासाठी आपला मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन केले. या शिबिरासाठी चंदाबाई हुक़ूमचंदजी पाटनी, प्रमोद पाटनी, सुभाष बोहरा ,जयकुमार बोहरा, डिम्पल गौतम पगारिया , सतीश सुराणा, संजय संघवी, सचिन करवा आदिचे सहकार्य लाभले. डॉ राहुल जैन यानी संचलन केले तर प्रल्हाद देशमुख यानी आभार मानले.