Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RajsthanPoliticsUpdate : राजस्थानात काँग्रेसकडून होताहेत पक्षांतर्गत पातळीवरील असे मोठे बदल

Spread the love

राजस्थानात काँग्रेससमोर आलेले राजकीय संकट टळल्यानंतर काँग्रेसमध्ये  पक्षांतर्गत पातळीवर  मोठे बदल  मोठे बदल केले जात आहेत.  काँग्रेसने राजस्थान काँग्रेसचे प्रदेश प्रभारी पदावरुन अविनाश पांडे यांची पदावरुन हकालपट्टी करून त्यांच्या जागी आता अजय माकन यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.  पक्षाचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांनी हा आदेश जारी केला आहे. या शिवाय काँग्रेसने सचिन पायलट यांच्यासह बंडखोरांनी उपस्थित केलेल्या तक्रारी ऐकण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापनाही केली  असून या समितीमध्ये अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल आणि अजय माकन यांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या या निर्णयाबाबत राजस्थानचे नाराज माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयावर आभार व्यक्त करताना  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि ,  “राजस्थानात समन्वय स्थापित करण्यासाठी आज अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल आणि अजय माकन यांच्या रुपात तीन सदस्यीय समिती नियुक्त केल्याबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वाचे आभार. मला पूर्ण विश्वास आहे की, समितीच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानात संघटनेला एक नवी दिशा मिळेल.” तर  दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे कि ,  “अजय माकन यांची राजस्थान प्रभारी सरचिटणीसपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन. आपल्या नियुक्तीमुळे निश्चितच राजस्थान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या इच्छा-आकांक्षांना बळ मिळेल. उज्वल भविष्याच्या आशेसह मी अजय माकन यांचे वीरभूमी राजस्थानात स्वागत करतो.” सचिन पायलट यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते मंगळवारी जयपूरला परतले. यावेळी काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांना सगळ्या तक्रारी दूर केल्या जातील, असे आश्वास देण्यात आले होते, त्यानुसार हि कारवाई केली जात आहे. 

दरम्यान राजस्थान सरकारवर संकटाची छाया संपल्याचे सांगितले जात आहे. मात्र संकट केवळ टळलं आहे, असा दावा भाजपकडून केला जात आहे. काँग्रेस पार्टीच्या अनेक प्रभारींनी घरवापसी केली आहे. पक्षाकडून काँग्रेसचे आमदार भंवर लाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह यांचे  निलंबनही  रद्द करण्यात आलं आहे. या दोन्ही आमगारांवर अशोक गेहलोत यांच्या नेतृ्त्वात असलेल्या राजस्थान सरकार पाडण्याच्या कारस्थानात सामील असण्याचा आरोप लावण्यात होता. यानंतर पायलटच्या गटातील या दोन्ही आमदारांना पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वामधून निलंबित करण्यात आले होते.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!