Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मेरे प्यारे देशवासियो …. पंतप्रधान मोदींनी आपल्या सर्वस्पर्शी भाषणाने केले देशाला मंत्रमुग्ध …!! मोडला अटलबिहारी यांचा रेकॉर्ड

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडला अटलबिहारी वाजपेयी यांचा रेकॉर्ड

देशात कोरोनाचे संकट असले तरी आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा केला जात आहे .  यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी आपल्या सर्वस्पर्शी भाषणाने देशाला मंत्रमुग्ध केले. वास्तविक पाहता करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार?, कुठली घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. यापूर्वी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळया कार्यक्रमांची घोषणा केली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल बिहारी वाजपेयींचा रेकॉर्ड मोडला आहे. सातव्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केलं आहे. तर अटलजींनी ६ वेळा पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण केलं होतं.

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिंना आदरांजली वाहिली. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर अभियानाचाही उल्लेख केला. आत्मनिर्भर भारत हा 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र बनल्याचं सांगितलं. लाल किल्ल्यावरील यंदाच्या सोहळ्यात 800 ऐवजी 100 पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आलं. तसंच शाळकरी मुलं, सर्वसामान्यांना सहभागी होण्याची परवानगी दिली नाही. याशिवास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्स पाळणं बंधनकारक केलं.

देशात ७४ वा स्वातंत्र दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण समारोह पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र दिन हा कोरोना वॉरियर्ससाठी आहे. त्यामुळे लाल किल्ल्यावरील सोहळ्यात दीड हजार कोरोना वॉरियर्स उपस्थित होते. देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या ८६ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतासह, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या भाषणात त्यांनी काही मोठ्या घोषणाही केल्या.

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन, 1000 दिवसात प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरशी जोडणार, प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष अभियान, कोरोनावर लस, प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष अभियान, जम्मू काश्मीर आणि लडाख, राममंदिर , देशाचा विकास , विदेशी धोरण अशा अनेक विषयांना मोदींनी स्पर्श केला.

प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले कि , कोरोनाने सगळयांना रोखलं आहे. करोनाच्या कालखंडात करोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. सतत देशवासियांच्या सुरक्षेमध्ये असणाऱ्या लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.

 

आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे. देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार ? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये योगदान द्यायचे आहे. कृषिक्षेत्रात भारत आत्मनिर्भर आहे. फक्त देशाचीच नव्हे तर अन्य देशांना सुद्धा कृषिमालाचा पुरवठा करु शकतो.

एक काळ होता आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे. वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठया प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या FDI गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. करोना संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर FDI गुंतवणूक झाली आहे. मेक इन इंडियाच्या बरोबरीने आता मेक फॉर वर्ल्डसाठी उत्पादने बनवायची आहेत. विकास यात्रेत मागे राहिलेल्या देशातील ११० जिल्ह्यांना पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.

शेतकऱ्यांना बंधनातून मुक्त केले. माझ्या देशातील शेतकरी उत्पादन केल्यानंतर त्याल हवं तिथे तो विकू शकत नव्हता. आम्ही त्याला बंधनातून मुक्त केले. आता तो त्याला हव तिथे, त्याच्या अटीनुसार पिकवलेला कृषीमाल विकू शकतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सात कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिला. ८० कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत अन्न दिले. ९० हजार कोटी थेट बँक खात्यात जमा केले. ‘जल जीवन मिशन’तंर्गत दोन कोटी पेक्षा जास्त कुटुंबांना स्वच्छ पाणी उपलब्ध करुन दिले. ‘इज ऑफ लिव्हिंग’चा मध्यमवर्गाला सर्वाधिक फायद झाला आहे. स्वस्त इंटरनेट ते इकोनॉमिकल हवाई तिकीट, हायवे ते आय वे, परवडणाऱ्या दरातील घरे ते कर कपात या सर्व उपायोजनांचा मध्यवर्गाला फायदा होणार आहे.

करोना आला तेव्हा सुरुवातीला फक्त ३०० चाचण्या व्हायच्या पण आता दिवसाला सात लाख टेस्ट होतात. आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिला जाईल. तुमची प्रत्येक चाचणी, आजार याची माहिती त्या आयडीमध्ये असेल. देशातील शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. भारतातील तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मोठया प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरु होईल. कमीत कमी वेळेत करोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार आहे. दीड लाख पंचायतींमध्ये ‘ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचले आहे. वेळेबरोबर प्राधान्यक्रम बदलला आहे. पुढच्या १ हजार दिवसात सहा लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.  LOC पासून LAC पर्यंत ज्यांनी देशात्या संप्रुभतेला  धोका निर्माण केला, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. भारताच्या संप्रभुतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देश संकल्पित आहे. दहशतवाद किंवा विस्तारवाद असो, भारत ठामपणे मुकाबला करत आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या संबोधित मिशन गगयान तसेच गेल्यावर्षी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वयासाठी सीडीएस पदाच्या निर्मितीची घोषणा केली होती. या पदाची आता निर्मिती सुद्धा झाली आहे. असे अनेक मुद्दे मोदी यांनी आपल्या भाषणात मांडले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!