CoronaAurangabadUpdate : दुपारची बातमी : चार रुग्णांची वाढ , तीन कोरोनाबधितांचा मृत्यू, जिल्ह्यात 4256 रुग्णांवर उपचार सुरू

UPDATE : 2:30 PM
औरंगाबाद जिल्ह्यातील चार रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18085 एवढी झाली आहे. त्यापैकी 13254 बरे झाले तर 575 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4256 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (04)
एन तीन हडको (1), अन्य (1), जे सेक्शन, मुकुंदवाडी (2)
तीन कोरोनाबधितांचा मृत्यू
घाटीत बजाज नगर, वाळूज येथील 61 वर्षीय पुरुष, शहरातील गांधी नगरातील 70 वर्षीय स्त्री, गंगापूर तालुक्यातील घाणेगाव येथील 61 वर्षीय पुरुष कोरोनाबधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.