AurangabadCrimeUpdate : गतीमंद मुला-मुलींना एकत्र अंघोळ घातली, वसतीगह अधिक्षकासह १३ जणांविरुध्द गुन्हा

औरंगाबाद- हर्सूल परिसरातील गतीमंद मुलांच्या वसतीगृहात बुधवारी सकाळी साडेआठ वा. वय वर्षे ५ते १७ वयोगटातील गतीमंद मुलांना एकत्रित अंघोळ घातल्या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी वसतीगृह अधिक्षकासहित १३जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजिद बादशाह पटेल वसतीगृह अधिक्षक, योगेश जानू राठोड, महादेव मनिष निंबाळकर,संतोष पवार,शौकत पठाण, राजू पवार,जाकेर शैख, किरण हिवराळे, भाऊसाहेब काकडे व अन्य दोन महिलां अशा १३ जणांवर गतीमंद मुलांच्या हक्काववर, गदा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
वरील आरोपींनी काल सकाळी ८.३०च्या सुमारास वरील अल्पवयीन गतीमंद मुलांना उघड्यावर नग्न अवस्थेत अंघोळ घातली या प्रकरणी वसतीगृह अधिक्षक व अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिंन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पांडुरंग भागिले करंत आहेत